खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बेकायदेशीरपणे गुरांची वाहतुक चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) तीन गुरे बेकायदेशीर रित्या दाटीवाटीने वाहतूक करून नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून गुरांसह वाहन ३ लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकासह दोन गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिता अशी की, १० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मारवडहून अमळनेरकडे गुरे कोंबलेले वाहन येत असल्याची माहिती अमोल पाटील यांना मिळताच त्यांनी ही घटना पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना कळवली. त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे यांना मारवड रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ पाठवले. ८ वाजून २० मिनिटांनी पिकअप वाहन (एमएच १८ ,एए ४७५३) येताना दिसली. पोलिसांनी वाहन अडवले असता त्यात तीन गुरे निर्दयीपणे पाय बांधून कोंडलेल्या अवस्थेत दिसून आले. चालकाला नाव व परवाना विचारले. चालकाने त्याचे नाव सुनील दशरथ मोकळे (वय ४७ रा पवननगर,  चाळीसगाव रोड धुळे) असे सांगितले आणि त्यांच्याकडे कोणताच पुरावा नसल्याचेही सांगितले. ही गुरे किरण बापू चौधरी व भूषण बापू चौधरी (दोन्ही रा. पवननगर चाळीसगाव रोड धुळे) यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन बैल व १२ हजार रुपये किमतीचा एक बैल असे एकूण ३२ हजारांचे बैल, तसेच तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून सुनील मोकळे, किरण चौधरी, भूषण चौधरी यांच्याविरुद्ध प्राण्यांची क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड)(ई)(फ)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button