अमळनेर (प्रतिनिधी) वेगवेगळ्या घटनेते दोन व्यक्ती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पैलाड येथील भोईवाड्यातील प्रवीण भगवान भोई (वय ४५) हे ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सेंटिंग कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. मात्र ते बेपत्ता झाल्याच्या घटनेचे वृत्त कळताच त्याच्या आई वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने उपचारात त्यांचा वेळ गेला म्हणून उशिराने आई रेखाबाई भोई यांच्या खबरीवरून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत हिम्मतराव पंढरीनाथ पाटील (वय ७४) यांचे ३ रोजी घरात वाद झाल्याने ५ रोजी दुपारी दीड वाजता मोबाईल घरी ठेवून निघून गेले. ते आपल्या मूळ गावी नगावला गेल्याचे समजले. मात्र त्यांचा मुलगा ६ रोजी सकाळी त्यांना भेटायला गेला असता तेथूनही हिम्मतराव पाटील सकाळी ५ निघून गेले. मुलगा नंदकिशोर जाधव याने दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.