अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप पॅटर्नची “भुमिका पवार ही आईआईटी जेईई अॅडव्हांसमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. तिने अखिल भारत रँक ५०४ मिळवला आहे.
भूमिकाचा हा पहिला प्रयत्न होता. तिने जेईई मेन मध्ये अखिल भारत रँक २१४ मिळविला असून ती संपूर्ण खानदेशातील पहिली टॉपर आहे. भुमिकाच्या ह्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरजअग्रवाल, सर्व कार्यकारी मंडळ, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.ए.बी. जैन तसेच प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार, आनंद पटेल यांनी कौतुक केले.
परिश्रमातून मिळवले यश
भूमिका ही अत्यंत साधारण कुटूंबातील असून तिने आपल्या परीश्रमातून हे यश संपादन केले आहे. भुमिका हिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना तसेच प्रताप पॅटर्नचे विक्रांत कुमार व आनंद पटेल यांना दिले आहे. भुमिका पुढे जाऊन कंप्यूटर साइंसचे शिक्षण आईआईटीमधून घेवून एक उत्तम टेक्नोच्रा बनून देशाची सेवा करू इच्छिते.