एका दुकानात चोरट्याने संडास (शी) केल्याने दुकानदारांमध्ये संताप
अमळनेर (प्रतिनिधी) एकाच रात्री चोरट्यांनी शटर व कुलूप तोडून चार दुकाने फोडल्याची घटना ९ रोजी रात्री ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली. यात चोरट्यांनीमोबाईल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेले आहे. एव्हढेच नव्हे तर दुकानात चोरटा संडास करून गेल्याने संतपा व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खड्डा जीनला लागून असलेल्या दुकांनाजवळून एकजण सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले. त्याने दुकानदाराला घटना कळवली. दुकानदाराने दुकानावर धाव घेऊन पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राइण्डर मशीन , तांब्याच्या तारा व इलेक्टरीकल साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याच्या बाजूला असलेल्या दोन तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाईल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून आतील टेबल सरकवला आणि दुकानातील दुरुस्तीला आलेले ८ ते १० अँड्रॉईड मोबाईल , तसेच साधे १२ मोबाईल आणि ७ ते ८ हजार रुपयांचे मोबाईलचे साहित्य चोरून नेले. चोरट्याने एव्हढेच नव्हे तर दुकानात संडास करून गेला.
सना इलेक्ट्रिकल्समध्ये दुसऱ्यांदा चोरी
मयूर मोबाईलच्या एक दुकानाच्या आड असलेल्या सैय्यद इद्रीस यांचे सना इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे देखील कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यात सना इलेक्टरीकल दुसऱ्यांदा फुटले आहे.
एका दुकानात फसला प्रयत्न
त्याच प्रमाणे बाजूला असलेले संगम मोबाईल दुकान देखील आधी मागच्या बाजूने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडले पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला.सैय्यद इद्रिस यांनी ऑनलाइन तक्रार केली आहे.