खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एसटीचा वर्धापन दिनानिमित्त कळमसरे मार्गे चोपडा नंदुरबार बस सुरू झाल्याने आंदोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा आगाराची एस. टी. बस 1 जून एसटीचा वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे सुरू करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखर झाल्यामुळे कळमसरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी आंनद व्यक्त केला आहे. चोपडा आगाराची ही बससेवा सुरुवातीला 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मारवड वासरे खेडी मार्गाने सुरू होती परंतु प्रवाशी संख्या कमी असल्याने शिवाय बऱ्याच दिवसांपासून कळमसरे व परिसरातील ग्रामस्थांची ही बस कळमसरे मार्गे सुरू व्हावी यासाठी आग्रही मागणी देखील असल्यामुळे चोपडा आगाराचे व्यवस्थापक मा. महेंद्र पाटील यांनी आज 1 जून एसटीचा वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू केली आहे. ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबार पर्यंत धावेल.एकूणच,यामुळे थेट गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे यामुळे प्रवाशांमध्ये आनंद वातावरण पसरले आहे.

 

चोपडा आगाराची अशी धावणार बस

 

ही बस चोपडा येथून सकाळी 7 वाजता निघेल तर नंदुरबार येथे पोहचण्याची साधारण वेळ ही 11.15 वाजता पोहचेल. तर नंदुरबार हुन बस परत येताना दुपारी 11.45 वाजता निघेल. चोपडा येथे 4.30 वाजेपर्यन्त पोहचेल.यात कळमसरे मारवड येथे नंदुरबार जाताना सकाळी 8.30 वाजेपर्यन्त येईल व नंदुरबारहुन चोपडा जाताना दुपारी अडीच,तीन वाजेपर्यंत येईल याची नोंद प्रवाशांनी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. ही बस सेवा मारवड, कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून शहापूरचे सुपुत्र महेंद्र पाटील आगार व्यवस्थापक चोपडा यांच्या प्रयत्नांनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

…येथे करण्यात आला जंगी सत्कार

 

कळमसरे ग्राम पंचायत व गावाच्या वतीने अतिथी देवो भव या नात्याने एसटी कर्मचारी वाहक नितेश पाटील,चालक एम जी जगताप, वाहक आर. जे. पवार यांचा ग्राम पंचायत सदस्य दिनकर पारधी, विकास संस्थेचे संचालक योगेंद्रसिंह राजपूत मधुकर पाटील,भरत महाजन विठ्ठल नेरकर,अंबालाल राजपूत,सुदाम सैनदाने, राजेंद्र चौधरी पत्रकार गजानन पाटील तसेच समस्त कळमसरे ग्रामस्थ यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित जंगी सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button