खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्टार हेल्थ कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका, ग्राहकला ७ टक्के व्याजासह आरोग्य विम्याची रक्कम देण्याचे आदेश

धुळे ग्राहक न्यायालयाने दिला आदेश 

 

अमळनेर (प्रतिनिधी)  कोरोना काळात उपचार घेण्यासाठी लागणारा खर्च ९१ हजार ८४७ अतिनिधीरुपये व २०२१ पासून त्यावर ७ टक्के व्याज  पाच हजार रुपये मानसिक त्रासापोटी ५ हजार तसेच अर्जाचा खर्चापोटी ५ हजार रुपये स्टार हेल्थ कंपनीने तालुक्यातील नंदगाव येथील दाम्पत्याला देण्याचे आदेश धुळे जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की,  योगेश भटा पाटील व अश्विनी योगेश पाटील (रा.नंदगाव ता.अमळनेर) यांनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या धुळे शाखेमधून पूर्ण परिवाराची पाच लाखाची विमा पॉलिसी काढलेली होती.दरम्यान कोरोना काळात अश्विनी पाटील यांना कोरोनाची लागण होऊन निमोनिया झाला होता.त्यांच्यावर बालाजी कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते.त्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका होऊन पती योगेश पाटील यांनी विमा कंपनीकडे मेडिकल बिल साठी दावा दाखल केला होता. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या गाईडलाईन नुसार अश्विनी पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची आवश्यकता नव्हती म्हणून विमा कंपनीकडून मेडिकल बिल मागणीसाठी करण्यात आलेला दावा नाकारण्यात आला होता.त्यामुळे योगेश पाटील यांनी ऍड.चंद्रकांत येशीराव व ऍड. धनश्री येशीराव यांच्यामार्फत ग्राहक न्यायालय धुळे येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश नीता देसाई व सदस्या रसिका निकम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानन्तर डॉक्टरांना ऍडमिट करून घेण्याची आवश्यकता असल्यानेच दाम्पत्यावर ऍडमिट करून उपचार करण्यात आले आहेत. असे ग्राह्य धरले आहे. तसेच कंपनीने ज्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन विमा नाकारला होता. त्यासंदर्भात कंपनीने कोणतेही कागदपत्र आयोगाला सादर केलेले नाहीत. म्हणून विमा कंपनीने दाम्पत्याला  उपचारासाठी आलेला खर्च ९१ हजार ८४७ रूपये, तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल ५ हजार रुपये दंड व तक्रारि अर्जसाठी पाच हजार रुपये खर्च  तक्रार दाखल झाल्यापासून संपूर्ण रकमेवर सात टक्के व्याजाप्रमाणे येणारी रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button