अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळत उन्हातानात सक्रिय सहभागी झालेल्या ७० वर्षावरील शिलेदारांचा काँग्रेस बैठकीत सत्कार करण्यत आला. तसेच पुढील नियोजन करण्यात आले.
अमळनेर तालुका व शहर काँग्रेसची बैठक धनदाई शिक्षण संस्थेच्या हालमध्ये झाली. सभेच्या प्रारंभी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विषय, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी सभेसमोर मांडले. त्यात महत्त्वाचे म्हणजे, जळगाव मतदार संघाच्या महाविकास आघाडीत, काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसताना देखील, काँग्रेस पक्षाने पूर्ण आघाडी धर्म पाळला व प्रचारात आघाडी घेतली. त्यात विशेष बाब म्हणजे, सत्तरीच्या जवळपास असलेले कार्यकर्ते भर उन्हात, दुखणे बाजूला ठेवून, प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यांचा सत्काराचा विषय मांडला गेला. त्यानंतर शहराध्यक्ष श्री मनोज पाटील यांनी प्रचाराची वस्तुस्थिती आणि पुढे भविष्यात तालुका काँग्रेसला कशाप्रकारे काम करावे लागेल? याविषयी मार्गदर्शन केले. त्यात अंमळनेर तालुक्यात आता अंमळनेर येथे बैठक होणार नाहीत, तर प्रत्येक गण प्रमाणे बैठका घेण्याचे सांगितले. आणि अशा बैठका १५ दिवसात सुरू कराव्यात असेही सुचवले. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, धनदाई शिक्षण संस्था चेअरमन नानासो डी. पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, माजी नगरसेवक राजू फारकर, तालुका नेते शांताराम पाटील, गजेंद्र साळुंखे यांनी सहभागी होण्याचे उस्फूर्तपणे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी गीतांजली घोरपडे यांनी, सूत्रबद्ध व मुद्देसूद विचार मांडून, ऐकणाऱ्यांना प्रभावित केले. जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब मगन वामन पाटील यांनी, कार्यकर्त्यांना वास्तविकतेचे खडे बोल सुनावत असताना, पुरोगामी वारकरी संप्रदाय हा फक्त समाज सुधारण्याचे, नीतिमत्ता वाढवण्याचे चांगली कामे करत असताना, प्रतिगामी वारकरी हे काही पक्षांचा प्रचार मांडतात व अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, हे उदाहरणासह समजावून सांगितले. त्यानंतर माजी जी.प. सदस्य के.डी पाटील, गजेंद्र साळुंखे यांनी मनोगते झालीत. जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी, कार्यकर्ते भावनेच्या भरात कसे भरकट तात? याबाबत विचार मांडले. तर ७० वर्षावरील शिलेदारांचे फोटो सेशन झाले. त्यात उत्तम पुंडलिक पाटील, रोहिदास सुखा पाटील, श्रीराम आनंदा पाटील, मगन वामन पाटील, रामकृष्ण नामदेव पाटील, बाळाप्पा, शांताराम बापू, भागवत गुरुजी, डॉक्टर अहिरराव, संतोष नाना पाटील, यांचे सोबत इतरांचे फोटो सेशन झाले. व तदनंतर तालुका अध्यक्ष श्री सूर्यवंशी यांनी अमळनेर तालुका हा आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासाठी घेणे संदर्भात ठराव मांडला. अनुमोदन मनोज पाटील यांनी दिले. ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुलोचना वाघ यांनी अनुभवानुसार मौलिक विचार मांडले. व श्री बापूसाहेब शांताराम शामराव पाटील यांनी राजकारणाची अनेक उदाहरणे देऊन, अमळनेरच्या राजकारणाचा इतिहास मांडला. कार्यक्रमात सोशल मीडिया प्रमुख तुषार संदनाशिव, शरद पाटील, प्रवीण पाटील, पुनीलाल पाटील, अमित पवार, राजेंद्र साहेबराव पाटील, चुनीलाल पाटील, के. व्ही. पाटील, पि. वाय. पाटील, गणेश पाटील, भातू पाटील, अनिल मधुकर पाटील, शालिग्राम पुंजू पाटील, मुरलीधर भागचंद पाटील, पार्थराज पाटील, श्रीराम एकनाथ पाटील, मनोर उत्तम पाटील, शार्दुल पवार, अजहर अली, इमरान शेख, सई तेली, हिरालाल महाजन, हेमराज सोनवणे, अशिल शेख, कैलास प्रल्हाद पाटील, दिलीप साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, हर्षल जाधव, निळकंठ सोनू पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.