कितीही संपत्ती मिळाली तरी मनुष्याचे समाधान होत नाही

रत्नसुंदरसुरीश्‍वरजी मसा यांनी केले विवेचन

 

अमळनेर (प्रतिनिधी) मनुष्य पैशांच्या मागे धावतो आहे. कितीही संपत्ती मिळाली तरी त्यांचे समाधान होत नाही, तो श्रीमंत आहे, पण आनंदी नाही. परंतु गरीब पण आनंदी आहे, असे विवेचन प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्‍वरजी मसा यांनी अमळनेर येथे हॉटेल मिडटाऊन येथे रत्नप्रवचन मालेचे पहिले पुष्प गुंफतांना काढले.

याप्रसंगी अमळनेरच्या कुलदिपीका प्रवचन प्रवाहिका पू.सा.श्री संवेगनीश्रीजी उपस्थित होत्या. आनंदी जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे यासबंधी सविस्तर मार्गदर्शन करताना गुरूदेवांनी  पाच गोष्टी करायला सांगितल्या. त्यात मनाला पझेशन फ्री करा ः जीवनात पैशाला महत्व आहे. पण पैसा सर्वस्व नाही. हव्यास सोडला तर आनंदी जीवन जगता येईल.

ॲग्रेशन फ्री व्हा  ः  क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे. क्रोधामुळे वैयक्तिक, कौंटुंबिक, सामाजिक नुकसान होते. क्रोधामुळे शरीर आपले ऐकत नाही तर आपण कोणावर गरम होतो. जीवनातून क्रोध नाहीसा झाल्यास आनंदी जीवन जगता येईल.

डीप्रेशन फ्री जीवन जगा ः बहुतेक शिकलेली व श्रीमंत माणसे डीप्रेशनमध्ये जीवन जगतात. निरक्षर व गरीब माणूस डीप्रेशन मुक्त जीवन जगतो. आनंदी जीवन जगण्यासाठी डिप्रेशन मुक्त जीवन जगा.

सजेशन फी जीवन जगा ः सजेशन करणारा जीवनात अप्रिय होतो. कोणी सजेशन मागीतले तरच द्यायचे न मागता सजेशन देवू नका. सारख्या सूचना व मार्गदर्शन करणे सोडून द्या. आनंदी जीवन जगण्यासाठी सजेशन मुक्त व्हा.  नो

इंप्रेशन ः समोरच्यावर प्रभाव पडला पाहिजे. हा विचार मनात आणू नका व प्रभाव पाडण्यासाठी संपत्ती, साधने व कपड्याचा वापर करतात. परंतु त्यामुळे आनंदी जीवन जगता येईलच असे नाही. पैसा, वेळ, संपत्ती योग्य ठिकाणी खर्च करा. जीवनात तुम्हाला ओळखणारी माणसे खरी आहे का ? तुमच्यावर प्रेम करणारी माणसे हवी आहेत हे तुम्ही ठरवा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान १३जून पर्यंत दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत हॉटेल मिडटाऊन येथे ही प्रवचन माला सुरू राहणार असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *