अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील जैतपीर येथील के. पी.सोनार विद्यालयात 20 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. यामुळे शिक्षणासाठी मुलींची होणारी पायपीट थांबणार आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मयूर सोनार व संचालक मंडळ तसेच सरपंच संगीताबाई महिंद्र पाटील, उपसरपंच साहेबराव भुकन देशमुख, मुख्याध्यापक मुकेश अहिरे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मुलींना 20 सायकलीचे वाटप करण्यात आले. जैतपीर माध्यमिक येथे दूर वरून शिक्षण घेण्यासाठी मुलींना शाळेत येण्या जाण्यासाठी व मुली शिक्षणापासून वंचित राहू नये मुली ची गैरसोय होऊ नये म्हणून योजनाचां लाभ मुलींना देण्यात आला . सायकळीचा उपयोग दररोज शाळेत येणे- जाण्यासाठी करण्याचे आव्हान यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश अहिरे तसचे शिक्षक शिक्षिका यांनी केले. यावेळी मुलीचे पालक शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन. एच. आर. बाविस्कर यांनी केले. आभार आर. पी. मासुळे यांनी मानले.