तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तके प्राप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील उर्दू, मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

राज्य शासनातर्फे पहिली ते आठवीच्या सर्व  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके  दिली जातात, शाळा १५ जून ला उघडणार असल्या तरी त्याआधीच अमळनेर तालुक्यात पाठ्यपुस्तकांची उपलब्धता झाली आहे, १५ जूनला म्हणजेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना  पुस्तके देण्यात येणार आहे  त्यादृष्टीने १ जून पासून प्रताप हायस्कूल मधून पाठ्यपुस्तकांचे  वाटप शाळांना केले जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी  दिली आहे. ग्रामीण भागातील शाळांसाठी केंद्रप्रमुखांच्या  माध्यमातून प्रत्येक शाळेच्या प्राप्त संखे नुसार पाठ्यपुस्तके वाटप केले जाणार आहेत  सन २०२३/२४ च्या यु डायस वर विद्यार्थी च्या नोंदी प्रमाणे पुस्तके प्राप्त झाली आहेत,एक जून पासून त्यांचे वाटप केले जाणार आहे. खुल्या बाजारात पाठ्यपुस्तके उपलब्ध असले तरी त्यांच्या किमती वाढल्या आहेत, शासन पहिली ते आठवी च्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देत असल्याने पालकांचा खर्च वाचणार आहे.

 

अशी झाली पुस्तके प्राप्त

 

इयत्ता पहिलीसाठी 2218, इयत्ता दुसरी साठी 2536, तिसरी साठी 3207, चौथी साठी 3619, पाचवी साठी 3556, सहावी साठी 3664, सातवी साठी 4252, आठवी साठी 4148

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *