एका मिनिटात २२२२ रोपे लावून मानव निर्मित जंगलाकडे वाटचाल
अमळनेर (प्रतिनिधी) अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर महा- वृक्षारोपण करण्यात येणार असून एका मिनिटात २२२२ रोपे लावून मानव निर्मित जंगलाकडे वाटचाल करण्यात येणार आहे.
पावसाळाच्या सुरूवातीला संत सखाराम महाराज यांच्या हस्ते व मंत्री अनिल पाटील, माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, लोक प्रतिनिधी, समाजसेवक, महिला मंच, पत्रकार, शाळा – महाविद्यालयांतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत लवकरच एका मिनिटात २२२२ महावृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन सर्वांच्या वेळा घेऊन करण्यात येणार आहे. यानिमित्त जळगाव वन विभागाचे अधिकारी अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर ऐका मिनिटात २२२२ रोप लावण्याच्या कार्यक्रमाचे नियोजाबाबत चर्चा व जागा पाहण्यासाठी आले होते. सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सुदर्शन शिसव, वनपरीक्षेत्र अधिकारी पारोळा (अ. का.) अर्शद मुलानी, अमळनेर वनपाल प्रेमचंद सोनवणे, वनरक्षक जगदीश ठाकरे. सुप्रिया देवरे, टेकडी ग्रुप सदस्य हेमंत महाले, डॉ. राजेंद्र सोनार, डॉ. अनिल वाणी, डॉ. अपर्णा मुठे, टेकडी ग्रुप अध्यक्ष आशिष चौधरी उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आयआरएस संदीपकुमार साळुंखे वैयक्तिक लक्ष घालून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नागपूर येथून आपल्यात पहिल्या नियोजन बैठकीत उपस्थित होते. तसेच मारवड विकास मंच, पातोंडा विकास मंच, दहीवद विकास मंच, संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर, मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर., रोटरी क्लब, अमळनेर, लायन्स क्लब, अमळनेर, महिला हाऊसिंग ट्रस्ट, अमळनेर., अमळनेर महिला मंच ट्रस्ट, अमळनेर. पतंजली योग समिती, अमळनेरचे प्रतिनिधी उपस्थित होते.