अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्याने पांझरा नदीतून विहिरीवरील ७ हजार रुपये किमतीची ५० ते ५५ फूट केबल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील भिलाली येथे २७ रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दयाराम माधवराव पाटील (रा. एकलहरे) यांच्या शेतीसाठी भिलाली येथे पांझरा नदीत विहीर खोदली असून २७ रोजी तेथील विहिरीजवळची मोटारीची ७ हजार रुपये किमतीची ५० ते ५५ फूट केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मारवड पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत.