खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या एकाची ऍक्टिव्हा मोटरसायकल चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या एकाची ऍक्टिव्हा मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश छबिलदास पटेल यांची 10 हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा मोटरसायकल अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे . 24 मे रोजी सुरेश पटेल यांच्या पत्नी आणि मुलगा, एमएच 19 डी बी, 2357  या क्रमांकाची  ऍक्टिव्हा मोटरसायकल घेऊन यात्रा पाहण्यासाठी गेले असता त्यांनी ती व्यायामशाळेजवळ पार्क केली होती. मात्र साडे अकरा वाजेच्या सुमारास यात्रा पाहून परत आल्यानंतर मोटरसायकल पार्किंग केलेल्या जागी आढळून आली नाही. सुरेश पटेल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास संतोष पवार करीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button