खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

कलर काम करणाऱ्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून चोरट्यानी लांबवले ५० हजार रुपये

अमळनेर (प्रतिनिधी) कलर काम करणाऱ्याच्या सरकारी दवाखाण्याजवळ लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून चोरट्यानी ५० हजार रुपये लांबवल्याची घटना २५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण पंडित नेरकर (वय ३२ रा उंदिरखेडा ता पारोळा) हा कलर काम करणारा त्याची मोटरसायकलने (क्रमांक एम एच १९ ईएफ ४८२९ ) अमळनेर आला होता. त्याच्या मोटरसायकलच्या  डिक्कीत ५० हजार रुपये होते. काम आटोपून तो गांधलीपुरा भागातील वेश्यावस्तीकडे आला. मोटरसायकल सरकारी दवाखाण्याजवळ हँडल लॉक करून तो वेश्यावस्तीकडे गेला. तिकडून १०:३५ वाजता परत आला असता त्याला त्याची मोटरसायकलची डिक्की उघडी दिसली. त्याचे ५० हजार रुपये कोणीतरी चोरून नेल्याचे उघडकीस आले. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

 

सीसीटीव्ही कॅमेरेत चोर कैद

 

दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे व तपास पथकाने  या भागातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता गांधलीपुरा भागातीलच स्थानिकानी डिक्कीतील पैसे काढल्याचे दिसून आले. आरोपी निष्पन्न होताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपी फरार झाले. लवकरच आरोपीना पकडण्यात येईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button