खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

हसण्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने हल्ला

अमळनेर (प्रतिनिधी) मेहेरगाव शिवारात निंभोरा रस्त्यावर मला हसतात या कारणावरून एकाच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समाधान लाला भिल रा ताडेपुरा त्याचा मित्र प्रवीण अंकुश पारधी व समाधान लुकडू भिल रा देवगाव देवळी असे तिघे जण मेहेरगाव शिवारात निंभोरा रस्त्यावर वीट भट्टीवर माती भरण्यासाठी गेले होते. सकाळी ११ वाजता प्रवीण सोबत जेवण करत असताना मजाक करू  लागले. त्याचवेळी समाधान लुकडू भिल आला आणि त्याला वाटले की मला पाहून हसतात म्हणून त्याने शिवीगाळ करणे सुरू केले व फावड्याच्या लाकडी दांडक्याने  डोक्यात व कमरेवर  मारले. समाधान लाला भिल यास गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज व जवाहर मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले होते. उपचार घेऊन आल्यावर मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून समाधान लुकडू भिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button