अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
डेंग्यू रोगाविषयी जनजागृती व उपाय योजना डेंग्यू निर्मूलन करण्याबाबत जनसामान्याच्यां मनात रुजून गावागावांमध्ये डेंग्यू बाबत जनजागृती करण्यात आली. हस्त पत्रिका वाटप करण्यात आल्या कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. तसेच आजारी तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले व डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. तसेच बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी पत्रके देण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले डेंग्यू निर्मूलन करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रम साठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख, डॉक्टर बाळासाहेब वाभळे जिल्हा साथरोग अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ गिरीश गोसावी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फुगे, ( तालुका आरोग्य पर्यवेक्षक) यांनी तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी डेंग्यू संदर्भात मार्गदर्शन व उपाय योजना करण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.