तिघांनी एकाच्या मांडीवर व ढुंगणावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) गांधलीपुराच्या मुलांसोबत राहतो म्हणून तिघांनी एकाच्या मांडीवर व ढुंगणावर चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पारोळा रोडवरील वड चौकात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रेम गोपाळ धनगर (रा. शनिमंदिर चोपडा नाका पैलाड) हा १४ रोजी मोटरसायकलने जात असताना छकुल्या पूनम पाटील (रा. शनिमंदिर) , व शंकर पाटील या तिघांनी त्याला अडवून मोटरसायकल खाली पाडले. त्यामुळे प्रेमच्या हनुवटीला लागून रक्त वाहू लागले. तिघांनी त्याला शिवीगाळ करत गांधलीपुराच्या मूलांसोबत का राहतो म्हणून शिविगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. लागलीच छकुल्याने खिशातील चाकू काढून प्रेमच्या मांडीला व ढुंगणाला चाकू मारला. प्रेमच्या मित्रांनी त्याला डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेऊन तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील रामदास पाटील करीत आहेत.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *