खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

लग्नापूर्वीच शारिरीक संबंध करूनही असमाधानी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणासह त्याच्या बहीण आणि मेहुण्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा

 

अमळनेर (प्रतिनिधी) कपडे घेण्याच्या बहाण्याने बोलावून लग्नापूर्वी भावी पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून ‘समाधान’ होऊन लग्नास नकार देणाऱ्या सडावण येथील तरुणासह त्याच्या बहीण आणि मेहुण्याविरुद्ध बलात्कार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिंदखेडा येथील एका तरुणीचा विवाह अमळनेर तालुक्यातील सडावण येथील समाधान उर्फ राज पंडित दाभाडे याच्याशी ठरला होता. २६ जानेवारी रोजी शिंदखेडा येथे त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यादरम्यान समाधान व पीडित मुलगी याचे मोबाईल वर बोलणे व्हायचे. २३ एप्रिल २०२४ रोजी समाधान याने आपल्या भावी पत्नीला फोन करून आपल्याला कपडे घ्यायचे आहेत म्हणून एकटी ये असे सांगितले. मुलीने माझे वडील एकटी येऊ देणार नाहीत, असे सांगितले असता त्याने सांगितले की माझे बहीण मेहुणे पण सोबत आहेत. तू जर एकटी आली नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी संमती दिली. मुलगी बसने अमळनेर आली असता समाधान तिला घ्यायला आला. त्याने मुलीला आपली बहीण मेहुणे सपना व मुकेश साळुंखे यांच्या घरी नेले. तेथून दोघांनी समाधान व मुलीला खरेदीसाठी पाठवले. समाधान याने कपडे खरेदी न करता खाण्यापिण्यात वेळ घालवून  उशीर केला आणि परत बहिणीच्या घरी नेले. तोपर्यंत बहीण मेहुणे सडावण येथे निघून गेले होते. मुलीने समाधानला मामाच्या घरी ताडेपुरा येथे सोड असा आग्रह धरला. मात्र समाधान ने ऐकले नाही व रात्रभर येथेच थांबून शारीरिक संबंध करण्याचा आग्रह धरला. मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने बळजबरीने शारीरिक संबंध केले. आणि धमकी दिली की जर कोणाला सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. २९ एप्रिल रोजी लग्न असल्याने मुलीने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. २८ एप्रिल रोजी त्याने लग्न करण्यास नकार दिला. आज पर्यंत समाजाच्या लोकांची मध्यस्थी करून वाट पाहून देखील त्याने नकार दिला म्हणून तरुणीच्या फिर्यादीवरून समाधान, त्याची बहीण सपना, मेहुणे मुकेश साळुंखे यांच्या विरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button