खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रॅली, शिबिरे ,अभियान राबवून यंदा मतदानाचा टक्का २. २० ने वाढला

अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती.यात  रॅली, शिबिरे ,अभियान राबवण्यत आले. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा २.२० टक्के मतदान जास्त झाले आहे. २०१९ मध्ये ५३.५० टक्के मतदान झाले होते तर आता ५५.७० टक्के मतदान झाले आहे.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात केंद्रस्तरीय अधिकारांद्वारा गृहभेटी देण्यात आल्या. त्यामुळे नव मतदारांच्या नोंदी वाढल्याशिवाय मयत मतदारांच्या व स्थलांतरित मतदारांच्या नोंदी कमी झाल्याने मतदार यादी मधील अनावश्यक फुगवटा कमी झाला. तसेच शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांद्वारा नमुना अर्ज भरून घेण्यात आला. महिला टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाद्वारे शहरी व ग्रामीण भागात सातत्याने जनजागृतीसह अभियान राबविण्यात आले. विधानसभा मतदारसंघात ११ विशेष सुशोभित मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. प्रत्येक बुथवरील बीएलओकडून तेथील मतदारांना त्यांचा मतदान यादी क्रमांक व स्थळ यांचा उल्लेख असलेल्या वोटर स्लिप घरोघरी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे देखील मतदानाच्या टक्यात वाढ होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली. प्रशासनातर्फे मतदार दिनासह इतरही दिनाच्या औचित्याने नवमतदारांसह नागरिकांच्या रॅली काढण्यात आल्या. यामध्ये शाळा, महाविद्यालयेही सहभागी झाली होती. शिवाय विविध शासकीय विभागांमध्ये या दिनानिमित्त कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच मतदानाचे महत्त्व व मतदारांमध्ये जनजागृती साठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदान मोहिमेसाठी ‘एकी’टेडीबियरची निर्मिती केलेली होती. हा एकी विवाह सोहळे तथा विविध ठिकाणी जाऊन सर्वांनी मतदान करावे. या जनजागृतीसाठी व मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निमंत्रण देत होते. स्वीप उपक्रमांतर्गत जनमानसात मतदान जागृती होण्यासाठी व नव मतदारांचा या प्रक्रियेत सहभाग होण्याच्या उद्देशाने ‘तारीख तेरा मतदान मेरा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर, यांच्या मार्गदर्शनाने काम केले. त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारी पेक्षा यावर्षी २.२० टक्क्याने मतदानात वाढ झालेली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button