अमळनेर (प्रतिनिधी) विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी टाकळी येथे भव्य वधू वर परिचय मेळावा १२ मे आयोजित करण्यात आला आहे. बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात हा मेळावा होणार आहे.
अकोला येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी या तालुकास्तरावर हा मेळावा सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. विदर्भ भावसार समाजाच्या या समूहातून गेल्या चार वर्षापासून सदरची सेवा विदर्भ भावसार समाजाचे अध्यक्ष, सदस्य पदाधिकारी विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत.यापूर्वी २०१४ मध्ये अकोला येथे अकोला जिल्ह्याने भावसार समाजातर्फे आयोजित केला होता. बार्शीटाकळी हे गाव अत्यंत ऐतिहासिक असून या गावात पुरातत्वीय महत्व असलेले खोलेश्वर मंदिर व कालिंका माता हे प्राचीन मंदिराचा या निमित्ताने भक्तांना लाभ होणार आहे. यावेळी भावसार समाजातील विदर्भाच्या तथा महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात तथा महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील उपवधू वर या मेळाव्यास हजर राहतील. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विदर्भ भाषा समाज व बार्शीटाकळी भावसार समाज तथा जिल्ह्यातील सर्व तालुका भावसार समाज या उपक्रमास सहकार्य करत असून या कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्णत्वास येत आहे. गावातील तथा परिसरातील सर्व भावसार समाज मंडळी महिला पुरुष तथा युवक वर्ग सुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यरत झाला आहे. कार्यक्रमात वधू वर परिचय स्मरणिका आणि होणारा वधू वर परिचय महत्त्वाचा आहे. संपूर्ण विदर्भातुन भावसार समाज बंधू भगिनी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येतात आणि आप- आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एकत्र येत असतात तर या निमित्ताने समाजातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या समाज सेवक उपस्थित राहणार आहे.
वधू वर यांचेसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध
वधू वर यांचेसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले असून फॉर्म एका आठवड्यात सऱ्योजकांकडे जमा करून द्यावेत असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरचे फार्म पोस्टाने किंवा 9822221991, 9423601337 या संपर्क मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप किंवा मेलवर फार्म आणि फोटो पाठवू शकतात. भावसार समाज बांधवांनी या वधू वर मेळावाला भरभरून मदत करून अन्नदानात सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष अरूण भावसार यांनी केले आहे.