अमलनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील चोपडा रेल्वे गेट जवळच्या रस्त्यावरील नव्या उड्डाण पुलासाठी व राज्य महामार्ग दुरुस्तीसाठी टाकलेली सव्वा लाखाची खडी चोरल्याप्रकरणी नगांव येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर चोपडा रस्त्याच्या व रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कौस्तुभ नरेश पाटील वय २३ रा कृषिनगर या अभियंत्यांने ५०० ब्रास खडी टाकलेली होती ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपुर्वी ईश्वर मंगा कोळी उर्फ बापू कोळी रा.नगाव यांनी गांधली पाझर तलावाजवळील सुमारे सव्वा लाख रुपयाची १०० ते १२५ ब्रास खडी चोरून नेली कौस्तुभ पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून ईश्वर कोळी उर्फ(बापू कोळी) याच्याविरुद्ध भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए. एस. आय. सुभाष साळुंखे करीत आहेत.