नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या विद्यार्थिनीची अमळनेरात घरी आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.6 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

निकिता रविंद्र पाटील (वय 19 )असे मयत मुलीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील सानेगुरुजी संकुलात असलेल्या प्रसिद्ध रामभाऊ चहावाले (लिबर्टी टी) चे मालक रविंद्र रामकृष्ण पाटील यांची मुलगी होती. भालेराव नगरात त्यांचे घर असून काल दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली.अर्ध्या तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आकांडतांडव केला.डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पोलीस पंचनाम्यानंतर काल सायंकाळी अमळनेर ग्रामिण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन होऊन सायंकाळी उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान निकिता ही अत्यंत गुणी व देखणी होती. सानेगुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला होता.गेल्या वर्षी अखेरच्या वर्षाला असताना नुकतीच ती परीक्षा दिल्यानंतर सुट्या लागल्याने अमळनेरात आली होती.शनीपेठ येथे तिच्या काकांकडे नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात देखील निकिताने आनंदात भरपूर मौजमजा केली होती.असे सारे काही आलबेल असताना तिने आत्म्याहत्येसारखा कठोर निर्णय का घेतला याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले असून झालेल्या घटनेने तिच्या कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. या घटनेने शनीपेठ व भालेराव नगर परिसरात शोकळला पसरली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.तिच्या पश्यात आई वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *