खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

डांगरी येथे एकाने तिघांवर चाकू हल्ला करून केले गंभीर जखमी, पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)  एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ रोजी रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान तालुक्यातील डांगरी येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी  अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना गल्लीतील नाना रामभाऊ शिसोदे हा दोन तीन वेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. रात्री ९ ते साडे नऊ दरम्यान नाना पुन्हा परत आला आणि त्याने  राजेंद्र शिसोदे यांच्या मागाहून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक हातातील चाकूने राजेंद्र याच्या पोटावर हातावर चाकूने वार करू लागला. त्याला आवरण्यासाठी प्रकाश शिसोदे पुढे गेले असता नाना ने त्यांच्याही पाठीवर वार केला. तसेच प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे यांच्याही पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही म्हणत पळून गेला. तिघे जण जखमी झाल्याने तेथे जमलेले अशोक संतोष चोथमल,  प्रशांत नीळकंठ चोथमल, शशिकांत लोटन चोथमल व इतरांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारंग आणि राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना नर्मदा मेडिकल फौंडेशन मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले तर प्रकाश शिसोदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. प्रकाश शिसोदे यांच्या जबाबवरून मारवड पोलीस स्टेशन ला आरोपी नाना शिसोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक , सुनील आगोणे, सुनील तेली, धनंजय देसले यांनी २६ रोजी पहाटे साडे चार वाजता डांगरी येथे जाऊन आरोपी नाना याला अटक केली आहे. आरोपीला अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्या स्वाती जोंधळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button