खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात हस्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, तर दुकान फोडून 4 हजार लांबवले

दोन्ही घटनेत चोरटा सीसीटीव्हीत कैद

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू. प्लॉट भागातील हस्ती बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दि 20 च्या मध्यरात्री झाला. यासोबतच याच चोरट्याने आययुडीपी कॉम्प्लेक्स मधून साई मल्टीसर्व्हिस हे दुकान फोडून 4 हजारांची रक्कम लंपास केली आहे. चोरटा दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांना तपास लावणे सुकर झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेनुसार चोरट्याने आधी रात्री उशिरा 1.30 वाजता बॅंकेच्या बाहेर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला त्यानंतर चोरट्याने बँकेचे मॅनेजर श्री शिंपी बँकेच्या वरच्या मजल्यावर राहत असल्याने आणि ते बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला कपात वैगरे उघडून पाहिले असता त्याच्या काहीही हाती लागले नाही, त्यानंतर त्याने रात्री 3 वाजता स्टेट बँके जवळील आयुडीपी संकुलातील साई मल्टिसर्व्हीस या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला येथे चार हजार किरकोळ रक्कम त्याच्या हाती लागली मात्र याठिकाणी थोडी नासधूस त्याने केली.त्यानंतर शेजारी असलेले लौंड्रि दुकान व कुरिअर दुकानही फोडले मात्र येथेही फारसे त्याला काही मिळु शकले नाही. सकाळी या सर्व घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्याचा तपास सुरू केला आहे.सदर घटनेत अद्याप गुन्हा नोंद झाला नसून पोलिसांनी गांभीर्याने शोध घेतल्यास निश्चितच तो चोरटा पोलिसांच्या हाती लागू शकणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button