अमळनेर (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे बस स्थानक परिसरात श्री संत सखाराम माऊली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे मोफत पाणपोई सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे वटसरुंची हान भागत आहे.
या पाणपोई मुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना भर उन्हाळ्यात दुपारी थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे वाटसरूंना व सप्तशृंगी देवीच्या गडावर पायी जाणाऱ्या भक्तांना देखील पाणपोईचा फायदा होत आहे.