खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

फापोरे बु. विकास सोसायटीने शंभर टक्के कर्ज वसुली करून आर्थिक बाजू केली भक्कम

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील फापोरे बु . येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची मार्च अखेरपर्यंत १०० टक्के कर्ज वसुली झाली आहे. यामुळे कारचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

फापोरे विकासोने या वर्षी १ कोटी ६९ ला रुपये कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले होते. त्यानुसार मार्च महिनाअखेर वाटप झालेल्या रकमेचा भरणा बॅकेत जमा झाल्याने १०० टक्के वसूली  सोसायटीने केली. यासाठी चेअरमन भालेराव पाटील व्हाईस चेअरमन खंडेराव पाटील, प्रविण पाटील, शरद पाटील,  प्रताप पाटील, बाळसाहेब पाटील, प्रदीप पाटील, मुरलीधर पाटील, जितेंद्र पाटील, पंकज पाटील, अशोक पाटील, सुंदरबाई पाटील, भिकूबाई पाटील, नुतन बिऱ्हाडे, सचिव सुनिल पाटील कर्मचारी आर. एम. पाटील, योगेश पाटील, सुहास पाटील आदींनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे फापोरे बु. शाखेशी सलग्न बहादरवाडी वि.का.सोसायटी या संस्थेने १००% बँक कर्ज वसुली झाल्याबद्दल विभागीय उपव्यवस्थापक अनिल अहिरराव व क्षेत्रीय अधिकारी सुरेश धुडकू पवार, शाखा व्यवस्थापक योगेश पाटील तसेच संस्थेचे चेअरमन अनिता संजय पाटील व सचिव उत्तम  पाटील सर्व संचालक मंडळ या सर्वांचे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व कर्ज वसुली व्यवस्थापक मंगल सोनवणे यांनी जिल्हा बँकेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button