खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंगरूळ विकास सोसायटीने १०० टक्के कर्जफेड करून घालून दिला ऋण मुक्तीचा आदर्श

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ विकास सोसायटीने जिल्हा बँकेकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात घेतलेल्या दोन कोटी तीस लाख रुपये कर्जाची मार्च अखेर  पर्यंत शंभर टक्के कर्जफेड करून ऋण मुक्तीचा आदर्श घालून दिला आहे.

मंगरूळ विका सोसायटीत ५५१ सभासदांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर्ज घेतले होते. त्यापैकी ५३० सभासदांनी कर्जफेड केली आहे. मात्र विका सोसायटीने संस्थेकडील असलेल्या ठेवींमधून संपूर्ण कर्ज बँकेकडे परतफेड केली आहे. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या सर्व सभासदांचे संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील, व्हॉइस चेअरमन अरुण नामदेव घोलप, संचालक जे.पी पाटील, भाईदास पाटील, रणछोड पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, अरुण पाटील, दिलीप गढरी, मंगलाबाई पाटील, सिंधुबाई पाटील, भरत पाटील, भिला पाटील, सचिव निरंक पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील, हर्षल बागुल यांनी सहकार्य केले. संस्थेला नाबार्ड बँकेचे अधिकारी सुबोध अभ्यंकर, वामीयांनीही भेट दिली. बँकेचे उपविभागीय अधिकारी अनिल अहिरराव, बँकिंग क्षेत्रीय अधिकारी सी.बी. पाटील , गुलाबराव देशमुख व कर्ज वाटप शाखेचे शाखा व्यवस्थापक सागर पाटील व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button