खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धुळ्याहून अमळनेरकडे दुचाकीवरून येत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एक ठार

अमळनेर (प्रतिनिधी) धुळ्याहून अमळनेरकडे दुचाकीवरून येत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एक ठार तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्राप्त शाहआलम नगर येथील रहिवासी अरमान शाह कमाल शाह (वय 65) हे धुळ्याहून जवळच्या नातेवाईकाला भेटून अमळनेर या गावी जात असताना जानेवे गावाजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास लोखंडी भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमांमुळे अरमान शहा याचा जागीच मृत्यू झाला.त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता तेथे त्याच्या कुटुंबीयांची व गावातील लोकांची गर्दी दिसून आली. ट्रक चालक फरार झाला आहे.या घटनेने शोककळा पसरली आहे.कॉस्टेबल कैलास शिंदे व सागर साळुंखे यांनी पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button