खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

माझ्याशी प्रेम करशील का असे म्हणत एकाने महिलेचा केला विनयभंग

अमळनेर (प्रतिनिधी) माझ्याशी प्रेम करशील का म्हणत मागासवर्गीय महिला लहान मुलासह घरात एकटी झोपलेली असताना एकाने विनयभंग केल्याची घटना १७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकरखेडा येथे सुनील शांताराम पाटील याने महिला घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात जाऊन तिला प्रेमाची विचारणा केली. आणि महिलेचा हात धरला. महिलेने हात झटकून घराबाहेर पळून गेली. सायंकाळी महिलेचा पती कामावरून परत आल्यानंतर दोघेही सुनील याला जाब विचारायला गेले असता त्याने दादागिरी केली. त्यांनंतर महिलेने नातेवाईकांशी विचार विनिमय करून सुनील विरुद्ध विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button