खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जल जीवन मिशन स्तर 3 मध्ये मनुष्य, पाळीव प्राणी, पशु पक्षीचा विचार : उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे

 

अमळनेर (प्रतिनिधी) जलजीवन मिशन स्तर ३  प्रशिक्षण पुढील ३० वर्षेसाठी देखभाल व दुरुस्ती विषयाचे असल्याने खुप महत्वाचे आहे. यामध्ये मनुष्य, पाळीव प्राणी, पशु पक्षी या सर्वांचा विचार केला आहे,  असे प्रतिपादन उपमुख्यकार्यकारी अधिकारी भरत कोसोदे यांनी केले.

अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर ३) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती अमळनेर   तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात केआरसी म्हणून अमळनेर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधून सरपंच,  ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सदस्य, सचिव, आशावर्कर, पाणी पुरवठा कर्मचारी, बचत गट  प्रतिनिधी, ग्रामसेवक असे एकुण एका ग्रामपंचायत मधुन पाच व्यक्ती यांना प्रशिक्षण देण्यात आले. आपले गाव पाण्या संदर्भात कायम स्वरूपी पाणी टंचाईपासुन मुक्त होईल, असा हा कार्यक्रम आहे. या संदर्भात प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या गावात जल जीवन मिशन चे मार्गदर्शन करावे असे  सरपंच व ग्रामसेवक यांच्या शिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही असेही कोसोदे म्हणाले. एकुण १०  बॅच मध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील , विस्तार अधिकारी सुरेश कठळे, जिल्हा क्षमता बांधणी तंज्ञ  मनोहर सोनवणे, मनोहर मोरे, पांडुरंग कांबळे, राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष भुपेन्द्र महाले यांनी मार्गदर्शन केले.तंज्ञ प्रशिक्षक दिनेश पाटील , सुरेश महाले , ज्योत्स्ना पाटील , ज्योती पाटील, सुशील केदारे, राष्ट्रविकास संस्थेचे सचिव  तुषार पाटील यांनी प्रशिक्षण दिले. संस्थेचे संचालक रागिणी महाले तसेच संस्थेचे प्रतिनिधी नयना चौधरी,महेश माकडे, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, सीमा महाजन, अमोला सुर्यवंशी,निलेश पाटील, राहुल सूर्यवंशी, रोहन पाटील, कुणाल पाटील, भाग्यश्री गोसावी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button