अमळनेर (प्रतिनिधी) महिला दिनाच्या पूर्व संध्येला खास अमळनेर रसिकांसाठी पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय जुना टाऊन अमळनेर येथे दिनांक 7 मार्च रोजी सांय 7 वाजता भिजकी वही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अरुण कोल्हटकर हे मराठीतील मोठे कवी. त्यांची कविता अवघड आहे , कळत नाही असा सार्वत्रिक गैरसमज दूर करणारा हा कार्यक्रम आहे. हे केवळ कवितावाचन नाही, तर सुंदर असा नाट्यानुभव आहे.कवितेची अनुभूती आहे. वेगवेगळ्या स्त्रियांचा हुंकार आहे.वेदनेची दाहकता आहे. मानवी संस्कृतीमधील स्त्रियांच स्थान, या आणि अश्या अनेक विषयांना स्पर्श करत रसिकांच्या मनाला स्पर्श करणारा अनुभव म्हणजे भिजकी वही आहे. परिवर्तनच्या सात महिला अभिनेत्रींचा सकस , सुंदर व सदैव स्मरणात राहणारा अभिनय आणि शंभु पाटील यांच निवेदन आहे. परिवर्तन जळगावची सकस निर्मीती व ऊत्तम अनुभवाची परंपरा म्हणजे भिजकी वही आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ यांनी केले आहे.