उत्पन्न बाजार समिती एक दिवसाआड सुरू राहत असल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांचा वाढला ताण

१५ हजार क्विंटल पेक्षा अधिक आवकमुळे रस्त्यावर वाहनांची दीड ते दोन किमीपर्यंत रांग

 

अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवसाआड सुरू राहत असल्याने सहा मार्च रोजी बाजार समितीत १५ हजार क्विंटल पेक्षा अधिक आवक झाल्याने धुळे रस्त्यावर वाहनांची दीड ते दोन किमीपर्यंत रांग लागली होती. यामुळे व्यापाऱ्यांवर देखील ताण पडत आहे. तर  महाशिवरात्रीनिमित्त ८ मार्च रोजी बाजार समिती पुन्हा बंद ठेवली आहे.

  गेल्या आठवड्यात शासनाच्या धोरणाच्या विरोधात  व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता, कर्मचारी यांनी सर्वानुमते बंद पाळल्याने व्यवहार ठप्प होते. त्यांनंतर बाजार समितीत आवक वाढली. आलेल्या मालाचे नियोजन, विल्हेवाट लावत नाही तोपर्यंत पुन्हा शनिवार, रविवार बाजार समिती बंद असल्याने पुन्हा सोमवारी अचानक आवक वाढून बाहेर रस्त्यावर वाहने रांगेत लावावी लागली होती. व्यापाऱ्यांवर ताण पडला त्यामुळे माल पाठवणे ,त्याची व्यवस्था लावणे आणि रोखीने पेमेंट असल्याने आर्थिक नियोजन करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मंगळवारी बाजार समिती बंद ठेवली होती. पुन्हा बुधवारी आवक वाढली आणि वाहनांच्या रांगा धुळे रस्त्यावर आर के नगर पर्यंत लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता तर नियोजनासाठी बाजार समिती  कर्मचाऱ्यांची धावपळ उडत होती.

 

धान्याचा प्रकार, क्विंटल आणि कमाल भाव

 

गहू २५०० पोते ,२ हजार ७०१ रुपये , बाजरी २०० पोते, २४६५ रुपये , दादर २००० पोते ३९०० रुपये , हायब्रीड ज्वारी ११०० पोते २४२२ रुपये , लाल मका १००० पोते , २२६१ रुपये , व्ही टू चना २५०० पोते ,७६०० रुपये , चापा हरभरा २००० पोते , ५९५१ रुपये , डॉलर हरभरा सफेद ५०० पोते ,१०५०१ रुपये , यासह तूर ,सूर्यफूल , अजवान , गावठी हरभरा ,गुलाबी हरभरा या मालाची आवक झाली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *