खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपालिकेने बिफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करावी, भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)नगरपालिकेने बिफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी  व हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा १९८५ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यात गोवंश तसेच बैल वडू यांच्या हत्येवर प्रतिबंधक करण्यात आले आहे असून अमळनेर नगर परिषदमार्फत संदर्भीय जाहिरातीद्वारे वर्तमानपत्रात बिफ स्टॉल विक्रीची फी (बीफ विक्रीचा परवाना हक्क) वसुलीबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. नगरपालिकेने परवाना देणे म्हणजे एका गोवंश हत्येसाठी कत्तल खाण्याची परवानगी देण्यासारखे असून सदर जाहिरात महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा १९८५ च्या तरतुदीला डावलण्याचे निदर्शनास आडळून आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक व धार्मिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर जाहीर लीला प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेरतर्फे नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या लिलावास तात्काळ स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष विजयसिंग राजपूत, सरचिटणीस दिलीप ठाकूर,मोतीराम हिंदुजा सुभाष पाटील,दीपक भोई कमल कोचर, दीपक श्रावण पाटील,पंकज भोई, दिपक पाटील,महावीर मोरे,ईश्वर चौधरी, राहुल चौधरी, किरण बोरसे,सौरभ पाटील,निनाद जोशी,विजय बारी भारतीय जनता पार्टी अमळनेर विश्व हिंदू परिषद अमळनेर बजरंग दल अमळनेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button