खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धार येथे जल जिवन मिशन योजनेच्या कामात दिरंगाई व गैरव्यवहार होत असल्याचा ग्रामस्थांनी केला आरोप

काम थांबवून चौकशी करण्याची गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार  येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम काम दिरंगाईने आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करून संबधित ठेकेदारवर कारवाई करावी, अशी मागणी करून  गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा ग्रामीण कार्यकारी अभियंता, उपअभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन दिले आहे.

धार येथील यशवंत शंकर पाटील व ग्रामस्थ यांनी निवेदन दिले असून  त्यात म्हटले आहे की, या योजनेच्या इस्टीमेटनुसार काम झाले नसून पाहणी केल्यानंतर काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्याने त्यात अनियमितता आणि नियोजन शुन्य काम चालु आहे. यात इस्टीमेंट नुसार कामाची सुरुवात केलेली नाही. विहीर-पाण्याची टाकी- गावात पाईपलाईन व नळजोडणी. असे कामे असताना, पाणी टाकी अद्याप बांधलेली नाही, स्वीच रुम ही बनविलेली नाही आणि गावात खोदकाम करुन पाईपलाईन टाकली जात आहे. इस्टीमेटनुसार 6 kg/Cm2 प्रेशर होल्ड करणारी पाईप वापरायची असुन गावात तुलसी कंपनीचे 4 kg/Cm2 चे पाईप वापरले जात आहे. इस्टीमेट नुसार, योजनेची माहिती ही दर्शन फलकावर लावणे बंधनकारक आहे तरी योजनेची माहिती गावात कुणालाच नाही. गावात कुणाला सांगण्यात येत आहे की, अटल भुजल, 14 वा वित्त आयोगा मार्फत आहे. ग्रामपंचायती कडुन सक्तीने करवसुली करण्यात येत आहे व पाणी पट्टी, घरपट्टी व नळ कनेक्शनचे चार्जेस न भरल्यास नळ कनेक्शन देण्यात येणार नाही ही ग्रामपंचायतीची भुमिका आहे. इस्टीमेटनुसार पंपसेट (विहीरीवर) अदयाप नाही मशीन रुम 3 मीटर बाय 3 मीटर बांधलेली नाही तरी बिल काढण्यात आले आहे अशी माहिती आहे. गावात सद्याची नळकनेक्शन हे 3″ पाईपलाईनला दिलेले असुन सगळ्यांकडे नळ कनेक्शन आहेत आणि पाणीपुरवठा हा सुरळीत आहे. योजना ही मान्यता मिळलेल्या तारखेपासुन महिन्याच्या आत पुर्ण करावयाची आहे. सदर योजनेची मान्यता ही 01 नोव्हेंबर 2022 या तारखेस मिळालेली असुन अद्याप 1 वर्ष उलटलेल असुन योजना अंमलात आलेली नाही.  पाईपलाईन जबरदस्तीने टाकली जात असुन दमदाटीने ती 1 वर्षात जरी तुटली तरी आम्हांला काय करायचे अशी भूमिका आहे. योजना अमलात आणायची असेल तर ती वर्षानुवर्षे सुरळीत व्हावी यासाठी कुठलाही खटाटोप नाही. ग्रामपंचायतीकडून कुठलीही ठोस भुमिका नाही व सक्तीने करवसुली चालु आहे.लोकसंख्येच्या पुरेशा पाण्याचा उपलब्धतेबाबत खात्री केल्याशिवाय उर्वरीत काम करु नये. योजनेच्या दुरुस्ती व पुर्नवसनाची कामे पूर्ण करुन योजना कार्यान्वित होण्यापुर्वी ग्रा.पं. योजनेच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंदाजपत्रक तयार करुन त्यानुसार पाणी पट्टी वसुली व आकारणी करावयाची आहे. तरी ती योजना अंमलात येण्याआधीच सक्ती चालु आहे. योजनेअंतर्गत 100 टक्के नळजोडणी करण्याची गरज आहे, परंतु ती कर भरल्यावर देण्यात येत आहे अशी भुमिका ग्रामपंचायतीची आहे.

 

गोषवारातील अपूर्ण कामे अशी

 

-रुम (3m x 3m) किंमत 320058/- बनवलेला नाही. RCC BR-70,000 लिटर पाणी टाकी बनवलेली नाही. (किंमत – 1906188/-) पाणी पुरवठा साधने वरील कामे पूर्ण केल्याशिवाय गावात टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईनचे काम त्वरीत थांबवावे व जुने नळ कनेक्शन जे खोदकामामुळे तुटले आहेत ते त्वरीत जोडून पाणी पुरवठा करण्यात यावा. इस्टीमेट नुसार सद्याचा पाणीपुरवठा हा विहीर – 1 बोरी नदीतुन होत आहे. परंतु बोरी नदीत कुठलीही विहीर नाही, गावचा पाणी पुरवठा हा धरणात असलेल्या विहीरीतुन होत आहे. व गावच्याबोअरवेल मधुन होत आहे. अशा आशयचे निवेदन यशवंत शंकर पाटील यांनी दिले असून कामाची चौकशी होऊन तात्काळ कार्यवाही करावी असाही सुर धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button