खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्राच्या जागेचे सोमवारी होणार भूमीपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्राच्या जागेचे भूमीपूजन २६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केलेले आहे. गलवाडे रोड, गंगा एक्वाशेजारी ब्रह्माकुमारी विद्यालयास मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, राजयोग ध्यानाभ्यास आदी आध्यात्मिक कामासाठी जागा मिळालेले असून याचे भूमीपूजन आयोजित करण्यात आलेले आहे.  जगभरातील सर्वात मोठी आध्यात्मिक शिक्षण संस्था म्हणून ब्रह्माकुमारीज्चे कार्य सर्वश्रुत आहे. अवगुणमुक्त, व्यसनमुक्त आणि मूल्याधिष्ठीत समाजनिर्मितीसाठी अमळनेर सेवाकेंद्रामार्फत अनेकाविध उपक्रम राबविले जात आहेत. नवीन जागेत ते अधिकाधिक प्रभावी आणि विस्तृत स्वरुपात राबविले जातील असे ब्र.कु. विद्यादीदी यांनी सांगितले. भूमीपूजन राजयोगीनी ब्रह्माकुमारी संतोषदीदी, संयुक्त प्रशासिका, ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू आणि निदेर्शिका, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी, निर्देशिका, ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्र यांच्या पावन हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार उन्मेश पाटील उपस्थित असतील. माजीआमदार स्मिताताई वाघ, बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, साहेबराव पाटिल, डॉ. अनिल शिंदे, ब्र.कु. मधुकरभाई सोनार, वरीष्ठ राजयोगी, जळगाव श्री. धिरज सोनी, उद्योजक जळगाव प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य मीडिया विंग प्रमुख, जळगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या प्रंसगी माऊंट आबूहून आलेल्या राजयोगीनी संतोषदीदी यांचे प्रेरक विचार श्रवण करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ब्र.कु. विद्यादीदी, संचालिका अमळनेर सेवाकेंद्र यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button