खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

निम येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

मंत्री अनिल पाटील यांनी केले स्वागत

 

अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील निम येथील काँग्रेससह चौधरी मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गोवर्धन चे सरपंच पंकज पाटील यांनीही याप्रसंगी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे मंत्री अनिल पाटील यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या वेळी भगवान भिल, निम गावाचे सरपंच सुशील पाटील, तालुका फ्रुटसेल सोसायटीचे व्हाईस चेअरमन पुंजू श्रीसागर, जितू धनगर बन्सीलाल भील, बळवं कोळी, दिलीप कोळी अरुण कोळी, संभाजी पाटील, हर्षल चौधरी, गणेश कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील, मयूर पाटील, गोलू पाटील आदींचा समावेश होता. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल पाटील यांचे हात बळकट करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button