खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेंतर्गत कामाचा २६ रोजी ऑनलइऩ शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेंतर्गत समावेश केला असून या कामाचा शुभारंभ २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइ होणार आहे. नुकतीच रेल्वे सल्लागार समितीची बैठक झाली. असून अमृत भारत च्या अनुषंगाने आगामी सुविधा व अपेक्षा याबाबत समितीने आपल्या मागण्या सादर केल्या. अमळनेर स्थानक अत्याधुनिक होणार असून प्रवाश्यांसाठी सर्व सुखसोयी असणार आहेत.

या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्यमंत्री दर्शना जर्दोश उपस्थित राहणार आहेत. बैठकीस सल्लागार समितीचे चंद्रकांत कंखरे, निर्मलकुमार कोचर, राहुल पाटील, डॉ. संजय शहा, कीर्तीलाल पाटील, स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक प्रमोद ठाकूर, स्टेशन उपअधीक्षक प्रमोद ठाकूर, निवृत्त स्टेशन अधीक्षक डी व्ही वारुळे हजर होते. यावेळी सुरत भुसावळ पॅसेंजरच्या आगमनाची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी ७ वाजेची करावी, प्रवाश्यांच्या कोच इंडिगेटर प्रमाणे गाडी थांबा मिळावा , भुसावळ नंदुरबार ९०७८ गाडी सुरत पर्यंत करावी, बोरिवली नंदुरबार गाडी भुसावळ पर्यंत करावी , स्टेशनवर लिफ्ट ची व्यवस्था करावी , अमळनेर येथील धार्मिक स्थळे ,मंगळ मंदिर व सखाराम महाराज वाडी यांची माहिती ,प्रसिद्धी पत्र अथवा मंदिर प्रतिकृती डिस्प्ले करावी ,रामेश्वर एक्स्प्रेस ला अमळनेर ला थांबा मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button