स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

 

🔷 चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी 2024

 

◆ निकाराग्वा येथील शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्स 2023 चा ताज जिंकला.

 

◆ जम्मू आणि काश्मीर मधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

◆ शाहबाज शरीफ यांची पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे.

 

◆ पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपती पदी असिफ झरदारी यांनी निवड होणार आहे.

 

◆ मध्यप्रदेश राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे 50वे वर्ष आहे.

 

◆ आंतरराष्ट्रिय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

 

◆ मुल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

◆ महाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर जामनेर येथे उभारण्यात येत आहे.

 

◆ हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार फ्रान्स या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे.

 

◆ जगात सर्वात शक्तीशाली पासपोर्ट च्या यादीत(2024) भारत 85व्या स्थानावर आहे.

 

◆ 2023 मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत 84व्या क्रमांकावर होता.

 

◆ टी-50 नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

◆ जर्मनी या देशाचे माजी फुटबॉल पटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले आहे.

 

◆ देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन ओडिशा या राज्यात झाले आहे.

 

◆ ओडिसा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

◆ महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा हे शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून घोषीत केले आहे.

 

◆ आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

 

◆ आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा इराण येथे पार पडली आहे.

 

◆ खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश राज्यात आयोजित करण्यात आला आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *