बाहेरच्या टारगट पोरांच्या गोंधळाव्यतिरिक्त पाचही केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू

पहिलाच इंग्रजीचा पेपर झाल्याने विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा विश्वास

 

अमळनेर (प्रतिनिधी) बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. बाहेरच्या टारगट पोरांच्या गोंधळाव्यतिरिक्त पाचही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. एकही कॉपी केस झाली नसल्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले. तर पहिलाच इंग्रजीचा पेपर झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला.

 अमळनेर तालुक्यात १२ वीला  पाच परीक्षा केंद्रांवर ३ हजार ६६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ५८ विद्यार्थी गैरहजर असल्याने ३ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली.  तालुक्यातील मारवड, अमळगाव , प्रताप महाविद्यालय , जययोगेश्वर महाविद्यालय , एन टी मुंदडा हायस्कूल या पाच केंद्रांवर परीक्षा झाली. विद्यार्थ्यांना सोडायला आलेले पालक आणि काही टारगट मुले परीक्षा  केंद्रांबाहेर गर्दी करत होते. मात्र प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे पाच बैठे पथक नेमण्यात आले होते. तसेच गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या फिरत्या पथकाने देखील केंद्रांना भेटी दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.

 

परीक्षेसाठी असा होता बंदोबस्त

 

परीक्षेसाठी दोन  पोलीस अधिकारी ,२० पोलीस कर्मचारी ,४० पुरुष होमगार्ड , ११ महिला होमगार्ड बंदोबस्ताला होते.  आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहा पोलीस निरीक्षक अजित साळवे , शरद पाटील ,रवींद्र पाटील ,मिलिंद बोरसे या फिरत्या पथकाने केंद्रांना भेटी दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *