अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने पालटणार रूप : स्टेशन मॅनेजर शिंदे
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सल्लागार समिती सदस्यामार्फत रेल्वे बोर्ड अधिकारी समोर मांडण्यात आल्या तर अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने अमळनेर रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार आहे असे स्टेशन मॅनेजर अनिल शिंदे यांनी सांगितले. यावेळी सल्लागार समितीचे, चंद्रकांत कंखरे, निर्मळ कुमार कोचर, राहुल किशोर पाटील, डॉ.संजय शाह, किर्तीलाल पाटील आदी उपस्थित होते. तर रेल्वे पदाधिकारी मार्फत स्टेशन प्रबंधक अनिल व्ही शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवी जी पांडे, उपस्टेशन अधिक्षक प्रमोद जी ठाकूर, निवृत्त स्टेशन अधीक्षक डी. व्ही.वारुळे आदी उपस्थिती होते. बैठकीत प्रवाशांच्या सुविधा साठी मुद्देसुद व सकारात्मक सखोल चर्चा करण्यात आली. अमळनेर करांसाठी आनंदाची बाब म्हणजे केंद्र सरकारने अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर स्थानकाची निवड केली आहे त्यामुळे ,स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार आहे.मॉडर्न रेल्वे स्टेशन येणाऱ्या काळात अमळनेर करांच्या सेवेत असेल.
बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा
सुरत -भुसावळ पॅसेंजर ,अमळनेर आगमन पूर्वीच्या वेळी सकाळी 7 वाजता या वेळेवर करावी. प्रवाशांच्या कोच इंडिगेटर प्रमाणे गाडी थांबा मिळणे. भुसावळ -नंदुरबार09078 गाडी सुरत पर्यंत करणे. बोरिवली-नंदूरबार गाडी -भुसावळ पर्यंत करणे. स्टेशन वर लिफ्ट ची व्यवस्था करणे. अमळनेर येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे मंगळ मंदिर व सखाराम महाराज वाढी यांची माहिती,प्रसिद्धी पत्र,अथवा,,मंदिर प्रतिकृती डिसप्ले करावी. रामेश्वर एक्सप्रेस ला अमळनेर येथे थांबा मिळणे या सारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर काही समस्या स्थानिक पातळीवर निर्वाळा होईल याची ग्वाही, स्टेशन प्रबंधक-अनिल शिंदे यांनी दिली.