अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार आणि मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच जळगाव जिल्हा बॅकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली.
रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.त्याप्रसंगी शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे आदी उपस्थित होते..तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागातील पदाधिका -यांनी प्रवेश घेऊन ग्रंथालय विभागाचे शसंतोष दगडगावकर (प्रदेश कार्याध्यक्षपदी), प्रशांत लोंढे (प्रदेश समन्वयक पदी), दिपक जगताप (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी), राहुल पाटील (प्रदेश उपाध्यक्ष पदी), सय्यम नबी (प्रदेश सरचिटणीस पदी), प्रभु नारायण उरडवडे (प्रदेश उपाध्यक्ष पदी) निवड करण्यात आली. त्याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांचे खुप मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. रिताताई बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले की मी माझी जबाबदरी तन-मन धनापासून पूर्ण करेल संघटना वाढवेल, असे आश्वासन दिले.