खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बोरीवली ते नंदुरबार एक्स्प्रेसला धरणगांवपासून सुरू करण्याची आवास संस्थातर्फे मागणी

पश्चिम रेल्वेचे जीएम यांना देण्यात आले निवेदन

 

अमळनेर (प्रतिनिधी) बोरीवली ते नंदुरबार एक्स्प्रेसला धरणगांवपासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी आवास संस्थातर्फे पश्चिम रेल्वेचे जीएम  यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

अमळनेर रेल्वे स्थानकावर दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा आले होते. यावेळी आवास बहुउद्देशीय संस्थातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाडी क्रमांक ( १९४२४/२६ ) बोरीवली नंदुरबार एक्स्प्रेस ही गाडी दररोज असते आणि नंदुरबार स्थानकावर पांच तास थांबते म्हणून सदरील गाडी धरणगांव पासून सुरू करण्यात यावी जेणेकरून धरणगांव अमळनेर नरडाणा शिंदखेडा दोंडाईचा या भागातील नागरिकांना मुंबई जाणे सोपे होईल तसेच गाडी क्रमांक ( ०९०७७/७८ ) भुसावळ नंदुरबार स्पेशल एक्स्प्रेस या गाडीला उधना/सुरत पर्यंत करण्यात यावे. कारण नंदुरबार पर्यंत कमी संख्येने प्रवासी प्रवास करतात यामध्ये स्लीपर कोच ही खाली असतात म्हणून सदरील गाडी उधना पर्यन्त करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आवास बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख, रेल्वे यात्री मंचाचे अध्यक्ष डॉ इम्रान अली शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते देविदास देसले, इंजिनियर इम्रान कुरेशी, रतीलाल चव्हाण उपस्थित होते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button