अमळनेर (प्रतिनिधी) न्हाना भाऊ मांसारम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात पाचव्या दिवशी दत्तक ग्राममध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदान केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन पिशव्या भरून प्लास्टिक गोळा केले. यावेळी एकूण या विद्यार्थ्यांचे पाच संघ होते. यामध्ये सर्व संघांनी विविध ठिकाणी जाऊन प्लास्टिक गोळा केले,यामध्ये विद्यार्थी प्रताप भील,अजय भील, मुकेश बैसाने,विनायक माली, नाजमिन पठाण,कोमल पाटील,ललिता वडर,निकिता पाटील,निलेश गायकवाड, गणेश मोरे,पूनम भील, संजय सोनवणे, सागर पाटील, आकाश पाटोळे,कल्याणी पाटील,वैष्णवी भील, भाग्यश्री शिंदे, वर्षा कोळी,सचिन नाईक, हर्षल सुतार, नेहा भोई,निकिता वाघ आदीनी श्रमदान केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नॉट मी बट यु असा नारा दिला. त्यावेळी राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिलीप तुकाराम कदम उपस्थित होते.