खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंगळ ग्रह संस्थांचे संस्थापक डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट प्रदान

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व ३२ वर्षांच्या पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम केंब्रीज डिजिटल विद्यापीठाने पीएच. डी. ( डॉक्टरेट ) पदवी देऊन सन्मानीत केले. हरियाणा राज्यातील सुरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान समारोह झाला. भारत व नेपाळ मधील मोजक्याच मान्यवरांना हा बहुमान मिळाला आहे. महाले यांचे अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button