अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव ते सुरत रेल्वे महामार्गावर असलेले टाकरखेडा रेल्वे ससानकावर पुरेशा सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या स्थानकावर इतर स्थानकांच्या दृष्टीने प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सुरतकडे किंवा मुंबईकडे प्रवास करताना सोयीच्या दृष्टीने असलेल्या स्थानकावर टाकरखेडा,चांदणी,कुऱ्हे, ढेकू,दहिवद, दहिवद खुर्द, नगाव, देवगाव, देवळी, खेडी,व्यवहारदऴे या गावातील प्रवासी रोज शेकडोने ये जा करतात. या ठिकाणी फलक क्रमांक एक वरून दुसऱ्या फलकावर जाण्यासाठी पादचारी फुल नसल्याने दोन नंबर फलकावर जर एखादी गाडी उभी राहिली तर त्या गाडीखालून दुसऱ्या फलाटावर जावे लागते. त्यामुळे वयस्कर,दिव्यांग,व लहान मुले यांना जोखीम पत्करून दुसऱ्या फलाटावर जावे लागते. तसेच सुरतकडे जाणाऱ्या शेवटच्या फलकावर कुठलीही प्रवासी सुविधा उपलब्ध नाहीत त्यात प्रवासी निवारा,पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, बैठक व्यवस्था व शौचालय आधी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.तसेच फलाटाची उंची गाडीच्या उंचीच्या बरोबर नसल्याने हात सटकून अनेक जण जखमी झालेले आहे,त्यामुळे फलाटाची उंचीत वाढ होऊन इतर स्थानकांची ज्याप्रमाणे सुधारणा करण्यात आली त्याचप्रमाणे या स्थानावर प्रवासी सुविधा तसेच फलाटाची उंची दोन्ही बाजूने करून द्यावी अशी मागणी परिसरातील गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. हे स्थानक मुलबुत सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आले हे एक गौडबंगालच आहे, तरी संमधितांनी लक्ष घालून स्थानकाच्या कायापालट व्हावा अशी अपेक्षा केली जात आहे.