खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शाईला घाबरलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दबावाने पोलिसांनी खबरीलालला केले डिटेन

दोन पोलिस अन् एक अधिकाऱ्याकडून डिटेन, तरीही जिल्हाधिकाऱ्यांवर शाई फेकणारच.!

 

अमळनेर (प्रतिनिधी) शासकीय रेशन गोडाऊनमध्ये दरोडा टाकणाऱ्या अनिल पाटील यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता त्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती दिल्याने याचा निषेध म्हणून खबरीलालने त्यांच्या तोंडावर शाई फेकून तोंड काळे करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याला घाबरट (डरफोक)जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणून खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांना डिटेन केले.दोन पोलिस अन् एक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या ऑफिसवळून आज सकाळी डिटेन केले असले तरी साहित्य संमेलनात छोट्या खबरीलालकडून जिल्हाधिकाऱ्यांवर शाई फेकलीच जाणार आहे.  येथील शासकीय गोडाऊन मधील व्यवस्थापक रेशन दरोडेखोर अनिल पाटील हे वेळोवेळी जिल्हाधिकारी,  प्रांताधिकाऱ्यांच्या छाप्यात दोषी आढळून आले आहेत. याबाबत खबरीलालने ही वेळोवेळी पुरावे देऊन तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या मागे चौकशीचा ससे मीरा आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई न होता भ्रष्टाचारला प्रोत्साहन देत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अनिल पाटील यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यामुळे खबरीलालने भ्रष्ट्र अनिल पाटील यांना पाठीशी घातल्याने खबरीलालने जिल्हाधिकारी हे साहित्य संमेलनात आल्यास त्यांच्यावर शाई फेकून तोंड काळे करण्याचा इशारा दिला होता. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारीच पोहचल्याने त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना याची दखल घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर अप्पर पोसिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांना पोलिस ठाण्यात बोलावून समजूत काढली. मात्र संपादक ठाकूर यांनी त्यांच सर्व मुद्दे आणि वस्तूस्थिती त्यांच्यासमोर कथन केल्याने याच कोण चुकतय आणि कोण बरोबर याचा अनुमान पोलिस यंत्रणेलाही आला. तसेच खरोखर ठाकूर यांनी रविवारी साहित्य संमेलनाला येणाऱ्या जिल्हाधिऱ्यांवर शाई फेकून तोंड काळे केले तर नाच्चकी होईल, म्हणून रविवारी सकाळीच दोन पोलिस आणि एक अधिकाऱ्याने संपादक जितेंद्र ठाकूर यांना त्यांच्या ऑफिस वरून डिटेन केले. पोलिस यंत्रणेने आजच्या दिवशी डिटेन केले तरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही, ते अनिल पाटील यांनी केल्या पापावर जोपर्यंत कारवाई करीत नाही, तोपर्यंत खबरीलाल पाठपुरावाच करीत राहील. यानंतरही त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयातच जाऊन शाई फेकून तोंड काळे केले जाईल. एकतर त्यांनी निपक्षपणे कारवाई करावी, अन्यथा आंदोलनासा समोरे जावे.

 

पेन अन शाईची किंमत जिल्हाधिकारींना चांगलीच ठाऊक

 

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्रकारीता केली आहे, असे ते नेहमीच सांगतात, त्यामुळेच ते बातमी कशी पेरायची, स्वतः प्रकाशझोतात कसे राहायचे याचे गमक त्यांना माहिती आहे. म्हणजे लेखनीची ताकद त्यांना माहिती आहे. आणि त्या लेखनीतील शाईही त्यांना चांगलीच ठाऊक आहे. तिच्याने लिहा किंवा अंगावर फेका त्याचे परिणाम तेही चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे  जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारीता केली असेल तर त्यांनी किमान पत्रकारीतेची इभ्रत राखण्यासाठी आता तरी तक्रारींचा निपटारा करावा. त्यांनी निपटारा केल्यास खबरीलाल पत्रकार म्हणून निश्चितच त्यांचे भरचौकात स्वागत करेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button