अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामींचे जंगी स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित असलेले महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अमळनेर रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथून हंसानंद महाराज अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला गेले होते. जळगाव जिल्ह्यातून स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज अखिल भारतीय संत समितीच्या निर्देशक मंडळाचे सदस्य आहेत. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांचे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांचे गोरखपूर बांद्रा एक्सप्रेसने अमळनेर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यावेळी अमळनेर रेल्वेस्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी श्री कपलेश्वर मंदिर संस्थांचे उपाध्यक्ष सी. एस. पाटील, स्वामी देवेश्वर तीर्थ महाराज, सचिव मगन पाटील, ज्येष्ठ विश्वस्त घनश्याम अग्रवाल,विश्वस्त अॅड. राजेंद्र बी. चौधरी, अॅड. संभाजी पाटील, अतुल चौधरी, पत्रकार दिनेश पालवे, प्रा. डी. आर. चौधरी, भागवत अण्णा, माधव देवधर, श्रावण तेले व  अमळनेर मधील असंख्य भाविकांनी महाराजांचे स्वागत केले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने खूप सहकार्य केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *