खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगाव ते कुर्हे ३७ लाख निधीतील रस्त्याचे आ. शिरीष चौधरींच्या हस्ते भूमिपूजन..

नगाव येथील अत्याधुनिक ग्रा.प.इमारातीचेही भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील नगाव बु येथे ३७ लाख निधीतून नगाव ते कुर्हे रस्ता डांबरीकरण व नगाव बु येथे १० लाख निधीतून अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारतीचे भूमीपूजन आ शिरीष चौधरींच्या हस्ते करण्यात आले.मोठ्या थाटात हा सोहळा पार पडला.
यावेळी आ शिरीष चौधरी यांनी नगाव बु येथील इंदासी माता मंदिराला भव्य सभामंडप देण्यासह आवशयक ती विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.तर महेश पाटील यांनी आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातून नगाव येथे जोमाने विकास कामे सुरू असून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हिरा उद्योग समूहाच्या स्वखर्चातून नाला खोलीकरण करण्यात आले आहे,तसेच गावात जलयुक्त शिवार ची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने आंमदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.तर प स सदस्य विनोद पाटील यांनीही आमदारांनी महत्वपूर्ण रस्ता मंजूर करून लागलीच काम सुरु केल्याने व विकासासाठी मोठा निधी दिल्याने आभार व्यक्त केले.व विकासाला साथ देण्याची ग्वाही देखील दिली.
यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, सरपंच महेश पाटील,सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, किरण गोसावी, पंढरीनाथ गोसावी,हभप काशिनाथ महाराज नगावकर, ग्रामसेवक महेंद्र देसले, पोलीस पाटील प्रवीण गोसावी, युवराज पाटील, अरुण चौधरी,जितेंद्र गोसावी,योगेश गोसावी, रोशन सोनवणे, भूषण गोसावी,कैलास कोळी, संभाजी पाटील, विनोद कोळी, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, दिनेश पाटील, नंदू पाटील, संजय पाटील, देवीदास पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, धनराज पाटील, नाना नाईक, मगन नाईक, विजय पाटील, संतोष पाटील,सजन पाटील, चुडामन जाधव, देविदास बोढरे, पुरुषोत्तम पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button