खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

चिमनपुरी पिंपळे येथील गुरुदेव दत्त मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहीम

सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील तीर्थ क्षेत्र गुरुदेव दत्त मंदिर व तिघी गावाच्या परिसरात अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

परिसर स्वच्छ केल्याने समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गुरुदेव दत्त मंदिर श्री चमत्कारी शनी मंदिर महादेव मंदिराचा परिसर यांचा मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कै.सु आ पाटील माध्य विद्या.पिंपळे मुख्याध्यापक अशोक देसले व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button