खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात रांगोळी स्पर्धेतून मतदार जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) मतदार जागृती दिनानिमित्ताने झालेल्या रांगोळी स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा अमळनेर प्रांत ऑफिस कार्यालय येथे झाली.

२५ जानेवारी मतदान दिवस आहे.  या दिनानिमित्त जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने रांगोळीस्पर्धा घेण्यात आली. सुंदर रांगोळी प्रसंगी प्रांत अधिकारी महादेव खेडकर, संचालक अभिजीत भांडारकर आणि गावातील नागरिक कर्मचारी यांनी भेट देऊन रांगोळीचे कौतुक केले. प्रा.डॉ श्वेता वैद्य, डॉ अनिता खेडकर, डॉ. अस्मिता सर्वैया, आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारतीताई पाटील व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील व प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे देखील सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button